हट्ट करणे हे बाल्यावस्थेचे लक्षण गणले जाते. बालहट्ट, राजहट्ट, स्त्रीहट्ट अशा तीन प्रकारचे हट्ट मानले जातात. या तीनही हट्टांची भाषा मौनातून आणि संकेतातून व्यक्त होत असते. लहान मुलांना भाषा अवगत नसल्याने त्यांनी संकेताने व्यक्त होणे स्वाभाविक आहे. घरात स्त्री केंद्रस्थानी असली तरी स्त्रीसुध्दा मोकळेपणाने बोलू शकत नसल्याने तिलासुध्दा संकेतांचा वापर करावा लागणे अपरिहार्य असते. राजा मात्र संपूर्ण राज्याचा प्रमुख असतो. तरी सुध्दा सर्वांना समजून घेताना तर कधी समजून सांगताना त्याला भाषेचा समर्पक वापर करावा लागतो कारण त्याचे एखादे चुकीचे वचन चूकीचा संदेश प्रसारित करू शकते. राजाची भाषिक अपरिहार्यता हा अभ्यासाचा विषय ठरू शकतो.
१
संकुलाचा पुनर्विकास करीत असताना विविध वैचारिक गटांची, विविध वयोगटातील प्रमुखाशी संवाद साधणे आवश्यक असते. काही गट हे विरोधात असतात तर काही विरोधात असून सक्रीयपणे काम करीत असतात. अशा वेळी संकुलाच्या प्रमुखाला भाषेचा समर्पक वापर करावा लागतो. प्रत्येकाचे विचार समजून घेत एखाद्या प्रमाण विषयावर एकमत घडवून आणणे हे संकुलाच्या प्रमुखाचे काम असते. त्याने आपल्या भोवती निर्माण झालेल्या विविध मतांची हट्टसारणी बनवायची असते... म्हणजे कोणते मत राजहट्टाचे आहे आणि कोणते मत स्त्री हट्टाचे आहे हे ओळखून त्याची नोंद मनात पक्की करावी लागते.
स्त्री हट्ट हा कौटुंबिक आणि भावनिक स्वरूपाचा असतो. आपल्या कुटुंबाचे हीत पाहणारी स्त्री मर्यादित स्वरूपात समाजाचा विचार करीत असते. तसेच तिला आपल्या कुटुंबियांचे सर्वच बरोबर वाटत असते. बालहट्ट हा पूर्णपणे आस्वादात्मक, खिळाडूपणाचा आणि क्वचित प्रसंगी अव्यवहार्य असतो. राजहट्ट करणारी माणसे आक्रमक, अभ्यासू आणि व्यवस्थेत महत्वाचे पद भूषविणारी असतात. अशा हट्टांना समजून घेणे संस्था प्रमुखासाठी आव्हान असते.
सुसंवाद निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले उपक्रम, सभा, चर्चासत्रे, नियोजन सभा निर्माण करून त्यातून सकारात्मक संवाद निर्माण करणे आवश्यक असते. संस्था प्रमुखांनी या विविध उपक्रमाच्या निर्माणावर भर देताना त्याचे नेतृत्व दुसर्या कोणाला तरी द्यायला हवे. सभासदांचा सहभाग वाढवावा आणि संवाद निर्माण करावा ज्यामुळे सद्य स्थिती आणि कामकाजातील, नियोजनातील विविध शक्यता तपासता येऊ शकतात. सिक्स सिग्माच्या DMADV चा अभ्यास येथे महत्वाचा ठरतो
२
काही हट्ट या तिघांपेक्षा वेगळे असतात. नकारात्मकता घेऊन वावरणाऱ्या या व्यक्तींना आपण निगरगट्ट संबोधू शकतो. त्यांना कोणाचेच हीत अहीत किंवा सकारात्मक बदल अपेक्षित नसतो. सर्वत्र नकारात्मक भूमिका घेऊन स्थितीशील राहणाऱ्या लोकांपासून संस्था प्रतिनिधी आणि सभासदांनी दूर रहायला हवे... परंतु हीच माणसे यत्र तत्र सर्वत्र दिसून येतात. यांची लगेच मैत्री होते आणि हीच माणसे मोठ्या समुहाने नकारात्मकता प्रसारित करीत असतात. यामुळेच कोणत्याही संकुलाचा पुनर्विकास अडचणीचा ठरतो.
१
https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/word
२
https://www.sixsigmadaily.com/what-is-dmadv/
पुनर्विकास खरंच तारेवरची कसरत
ReplyDelete